पंचायती राज नॉलेज कॅप्सुल

खेडी सुधारली तर देश आपोआप सुधारेल असं बरेच तज्ज्ञ म्हणतात. पण हा विकास करणार कोण? तर सरकार... मग हे गावातील सरकार अथवा शाशन म्हणजेच पंचायती राज आहे. या पंचायत राज विषयी जागरूकता वाढविण्यासाठी आपण एक "पंचायती राज नॉलेज कॅप्सुल" नावंच जनजागृती अभियान चालवले आहे. २०२२ चा पंचायती राज दिवस झाल्यांनतर पुढचे ३० दिवस दरदिवशी एक या प्रमाणे माहिती लोकांना दिली आहे. हा ब्लॉग म्हणजे त्याच माहितीचं संग्रहण आहे... दिवस १ ला - ग्रामपंचायत हे पंचायती राज मधले सर्वात छोटे पण खुप महत्वाचे युनिट आहे. आपल्या गावात ग्रामपंचायत आहे की ग्रुप ग्रामपंचायत ? आपल्या गावातील लोकसंख्येनुसार ग्रामपंचायत किती ग्रामपंचायत मेंबर असतात ते पाहूया
दिवस २ रा - ग्रामसभा... थेट लोकांना निर्णयप्रक्रिया मध्ये सामील करुन पंचायती राज बळकट करणारे माध्यम आहे... तर आपल्या गावात ग्राम सभा होतात का? अणि होतात तर वर्षाला कीती होतात?
दिवस ३ रा - आपल्या गावात पण ग्रामसभा ची पूर्व सूचना दिली जाते का? दवंडी, लेखी सूचना, एसएमएस हे किंवा असेच काय माध्यम वापरले जाते? आम्हाला कळवा.
दिवस ४ था - तर मंडळी, ग्रामसभे पूर्वी, तुमच्या गावात पण अशा वॉर्ड सभा व महिला सभा होतात का?
दिवस 5 वा - ग्रामसभा मध्ये ऐन वेळीचे विषय म्हणजे वादावादी आणि भांडण म्हणुन नाकारले जातात? आज जाणून घेऊन त्याच्या नियमाविषयी...
दिवस ६ वा- ग्रामसभेचे अध्यक्ष सरपंच असतात, हे तर माहिती आहे आपल्याला, पण सरपंच नसतील तर? समजून घेऊया हे अध्यक्षपद कसं ठरवल जात....
दिवस ७ वा - ग्रामसभा, अध्यक्षपद वगैरे सगळ ठीक, पण लोकच नसली तर? आणि नक्की हवीत कीती लोक? जाणून घेऊया कोरम विषयी...
दिवस ८ वा - वर्षाच्या खर्चाचं गणित नक्की ठरतं तरी कुठे? कोणत्या योजना आणायच्या? कोण लाभार्थी निवडायचे? जाणून घेऊया पहिल्या विशेष आर्थिक दृष्ट्या महत्त्वाच्या ग्रामसभेविषयी...
दिवस ९ वा - मंडळी, आपल्या गावातील ग्रामसभेला कोण कोण उपस्थित असते? आणि विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे भेटतात का?
दिवस १० वा - ग्रामसभा जशी लोकांची असते तशीच लोकनियुक्त प्रतिनिधींची ची प्रत्येक महिन्याला एक मासिक सभा होते....
दिवस ११ वा - आपल्या इथे पण अशा मासिक सभा होतात का? आणि त्याला आपले वॉर्ड मधील सदस्य जातात का?
दिवस १२ वा - सरपंच, प्रत्येक गावातल एक प्रतिष्ठेच पद... सरपंच होण म्हणजे काय काय जबाबदाऱ्या असतात, ते थोड जाणुन घेऊया...
दिवस १३ वा - सरपंच गावाच्या आर्थिक कारभाराला सुध्दा जबाबदार असतात बरं... त्यांच्या आर्थिक जबाबदाऱ्या अशा असतात...
दिवस १४ वा - सरपंच खऱ्या अर्थाने लोकसेवक असतात... जवळपास प्रत्येक घटकासाठी ते काम करु शकतात. लोकसहभाग व विविध शासकिय विभागांच्या मदतीने आपल्या गावात पण अशी कामे आपले सरपंच करतात का?
दिवस 15 वा - गावच्या विकासासाठी वेगवेगळ्या माध्यमातून निधी येत असतो. हा निधी येण्यासाठी व वापरला जाण्यासाठी त्याचबरोबर व्यवहार सोयीस्कर होण्यासाठी सरपंच व ग्रामसेवक यांनी मिळून वेगवेगळी बँक खाती उघडली जातात. त्याविषयी आज समजून घेऊयात...
दिवस १६ वा - गावच्या विकासासाठी वेगवेगळ्या माध्यमातून निधी येत असतो. हा निधी येण्यासाठी व वापरला जाण्यासाठी त्याचबरोबर व्यवहार सोयीस्कर होण्यासाठी सरपंच व ग्रामसेवक यांनी मिळून वेगवेगळी बँक खाती उघडली जातात. त्याविषयी आज समजून घेऊयात...
दिवस १७ वा - ग्रामपंचायत अधिनियम कलम ६२ नुसार ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक तयार करण्याची तरतूद आहे. दरवर्षी पुढील आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्यासाठी सरपंच जबाबदार असतात. सदस्यांची परवानगी घेऊनच सरपंच अर्थसंकल्प ग्रामसभेत सादर करू शकतात....
दिवस १८ वा - अंदाजपत्रक म्हणजे बजेट... यात कीती पैसे जमा होणार व किती खर्च होणार याचा अंदाज बांधला जातो... पण ग्रामपंचायत मध्ये किती जमा व खर्चाच्या बाजू कोणत्या ते एकदा जाणून घेऊया....
दिवस २० वा - आपल्या गावात कर कसा ठरवला जातो? आणि घरफळा/घरपट्टी लवकर भरली तर ५% सुट मिळते का?...
दिवस २१ वा - कर किंवा इतर मार्गाने मिळालेले उत्पन्न खर्च कसे बरे केले जाते, याचे काही निकष असतात का? चला पाहुया....
दिवस २२ वा - पण मंडळी गावात एखाद काम करायचं असेल आणि खर्च करायचे पैसे जर पुरणार नसतील तर कर्ज वगैरे घेता येते काय?...
दिवस २३ वा - सरपंच उपसरपंच यांना पगार मिळतो का? मिळतो तर किती मिळतो? चला जाणून घेऊया...
दिवस २४ वा - गावात विविध विकास कामे करायला ग्राम समित्या नेमल्या जातात, पाहुया त्यांच्या विषयी...
दिवस २५ वा - हे सरपंच उपसरपंच अथवा सदस्य अपात्र कधी ठरतात? जाणुन घेऊया त्या नियमांविषयी...
दिवस २६ वा - सरपंच अकार्यक्षम असतील तर त्यांना काढता येऊ शकते का? यासाठी अविश्वास ठराव काय असतो हे जाणुन घेऊया...
दिवस २८ वा - अगदी शेवटी जाताना ग्रामसेवक या शासकिय कर्मचाऱ्याविषयी जाणुन घ्यायला नको का?....
दिवस २९ वा - बघितलत शासन प्रशासन हातात हात घालून लोकांना घेउन काम करतील तेंव्हाच विकास होईल... ग्रामसेवक विषयी वाचून तुम्हाला पण हे पटल का?....
दिवस ३० वा - हे तुम्हाला महिती होत का?....

0 Comments